राष्ट्राचे आरोग्य मुलाखत
1986 मध्ये डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्याची पदवी संपादन करून भारतात परतले. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील गडचिरोलीसारख्या अति मागास भागात त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. ग्रामीण आणि आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याचा स्त्री-रोग-विज्ञानाच्या (gynaecological) दृष्टिकोनातून अभ्यास करायला डॉ. राणी बंग ह्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारची चिकित्सा ही त्या क्षेत्रातील नवी …